Accident News: वारीतील वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; पुणे– नगर महामार्गावर खासगी बसची धडक

कार्तिकी वारीतील वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; पुणे– नगर महामार्गावर खासगी बसची धडक
Accident News
Accident NewsSaam tv

शिरुर : पुणे– नगर महामार्गावर रांजणगावजवळ वारकरी दिंडीतून कार्तिकी वारीला पायी जात असताना खाजगी बसची धडक (Accident News) लागुन वारकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. तर एक वारकरी जखमी झाला आहे. गुलाब शेख असे अपघातात मृत्यु (Accident Death) झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

Accident News
Beed News: १० सोनोग्राफी सेंटर बंदच्या नोटिसा; जिल्हा शल्य चिकित्सक ॲक्‍शन मोडमध्ये..

शिरुर (Shirur) तालुक्यातील गोलेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा ही दिंडी पुणे– नगर मार्गावरुन आळंदीकडे मार्गस्थ झाली होती. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या खाजगी बसची धडक वारकरी दिंडीतील दोन वारकऱ्यांना लागली. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यु झाला.

जखमी वारकरी उपचारासाठी दाखल

एकजण जखमी झाला असुन जखमी वारकऱ्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खाजगी बस चालकाविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालकाला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com