Pune : हृदयद्रावक घटना! मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेला, पण तो पुन्हा घरी परतलाच नाही

भोर येथील‌ रायरेश्वराच्या पठारावर ट्रेकिंगला गेलेल्या बारामती येथील एका अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
pune news
pune news saam tv

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. भोर येथील‌ रायरेश्वराच्या पठारावर ट्रेकिंगला (Trekking) गेलेल्या बारामती येथील एका अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विद्यार्थी हा बारामतीमधील (Baramati) शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील आहे. शुभम चोपडे असं १७ वर्षीय मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. (Pune News In Marathi )

pune news
Indapur : डंपरची बुलेटला धडक, मुलगी ठार; चालक पाेलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले ४६ विद्यार्थी आणि ४ शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात होते. त्यामध्ये शुभमचाही सामावेश होता. ट्रेकिंग दरम्यान शुभमला दम लागला. त्यानंतर रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले गावाजवळ त्याला हृदयविकाराच्या झटका आला. त्यामुळे त्याचे मित्र त्याच्यासाठी धावत त्याच्या जवळ आले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला.

pune news
Ambernath News : अंबरनाथ शहर हादरले; सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार

दरम्यान, भोर तहसीलदार यांनी सदर घटनेची माहिती दिली. 'भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर चढत असताना कोर्ले या गावाजवळ बारामतीत राहणाऱ्या १७ वर्षीय शुभम प्रदीप चोपडे या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. सदर विद्यार्थी हा शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी असून सदर शाळेची सहल रायरेश्वर किल्ल्यावर ती आलेली असताना सदरची घटना घडलेली आहे',अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, शुभमच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या घटनेने त्याच्या शिक्षक आणि मित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com