Indapur Incident: ४० तासानंतरही शोध सुरूच! इंदापूर विहिर दुर्घटनेतील नातेवाईकांनी व्यक्त केला संताप; बचावकार्य संथगथीने सुरू...

Mhasobawadi Incident: विहिरीचे काम करताना चार मजूर अडकलेले आहेत. या घटनेला आता तब्बल ४० तासांपेक्षा जास्त वेळ झाला असून अद्याप शोधकार्य सुरूच आहे.
Indapur Incident
Indapur IncidentSaamtv

Pune News: इंदापूर (Indapur) तालुक्यातील म्हसोबावाडीत विहिरीचे काम करताना चार मजूर अडकले आहेत. या घटनेला आता तब्बल ३० तासांपेक्षा जास्त वेळ झाला असून अद्याप शोधकार्य सुरूच आहे. स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या जवानांच्या सहाय्याने घटनास्थळी बचावकार्य जारी आहे. अद्यापही शोध न लागल्याने मजुरांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाला धारेवर धरत रोष व्यक्त केला आहे.

Indapur Incident
Monsoon Session 2023: अहो जयंत पाटील आमचं तुमच्याकडेच लक्ष आहे, अजित पवारांचं सूचक विधान

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी (Mhasobawadi) येथे विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत बेलवाडी (Belwadi) गावातील चार मातीच्या ढिकाऱ्याखाली गाडले गेले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू असून आज तिसरा दिवस आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या कुटूंबीय आणि नातेवाईकांचे अश्रु थांबता थांबेनात. तीन दिवस उलटूनही शोध लागत नसल्याने नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस विभाग, प्रशासन व एन डी आर एफ चे पथक गांभिर्यपूर्वक या संदर्भात शोध मोहीम करत नसल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला असून प्रशासनाच्या कामावर रोष व्यक्त केला आहे.

Indapur Incident
Nagpur Online Game Fraud: ४ कोटींचं सोनं, अडीच कोटींची रोकड; अनंत जैनच्या बँक लॉकरमधून घबाड जप्त

दरम्यान, विहिरीला रिंग टाकण्याचं काम सुरू असतानाच अचानक मुरुम आणि मातीचा ढिगारा आत कोसळला. त्यामुळे चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलानी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण अशी आत अडकलेल्या कामगारांची नावे आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com