Viral Infection: बदलत्‍या हवामानाने वाढविला ताप; सर्दी, खोकल्याच्या औषधीची मागणी वाढली

बदलत्‍या हवामानाने वाढविला ताप; सर्दी, खोकल्याच्या औषधीची मागणी वाढली
medicines
medicines Saam tv

पुणे : गेल्‍या काही दिवसांपासून हवामानात सातत्‍याने बदल होत आहे. यामुळे विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझासह (Corona) कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अँटीव्हायरल औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घेण्याचे आवाहन (Doctor) डॉक्टरांनी केले आहे. (Maharashtra News)

medicines
Dhule News: धुळ्यात लिंबूच्‍या आकाराची गार; अवकाळी, गारपिटीने लग्न समारंभात धावपळ

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्‍याने बदल होत आहे. दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारवा, तर कधी ढगाळ वातावरण, वादळीवाऱ्यासह पडलेला जोरदार पाऊस असे सगळे वातावरण सध्या अनुभवण्यास मिळत आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसते. इन्फ्लूएंझा हा विषाणूंमुळे होणार आजार आहे. याचे इन्फ्लूएंझाचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे प्रकार आहेत. सध्या आढळणाऱ्या रुग्णांना ‘ए’ या उपप्रकारातील इन्फ्लूएंझाचा संसर्ग होत आहे.

वातावरणात सतत बदल होत असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची व्यवस्था बिघडते. त्यातून शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी होते. विषम वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण झालेले असते. त्यामुळे रुग्णाला पटकन विषाणूंचा संसर्ग होत असून त्यातून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्‍याचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष कदम यांनी सांगितले आहे.

अँटी व्हायरल औषधांची मागणी वाढली

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने अँटी व्हायरल औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षभरात फ्ल्यूवीरसारखे प्रतिजैविकांला मागणी नव्हती. पण, आता ही मागणी वेगाने वाढत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.

मास्कची मागणीत अंशतः वाढ

कोरोनामध्ये मास्कच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर मास्क वापरणे सोडून दिले होते. फक्त रुग्णालयांमधून मास्कची खरेदी होत असे. पण, आता मास्कची खरेदीत गेल्या महिन्याच्या तुलनेत काही अंश वाढ झाली आहे, अशी माहिती ऋषभ सर्जिकलचे अनुप गुजर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com