RTE Admission: आरटीईसाठी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून प्रत्‍यक्ष प्रवेशास सुरवात

आरटीईसाठी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून प्रत्‍यक्ष प्रवेशास सुरवात
RTE Admission
RTE AdmissionSaam Tv

सचिन जाधव

पुणे : राज्यातील शिक्षण विभागाने आज आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर केली. आरटीई (RTE) प्रवेशासाठी पुणे (Pune) जिल्ह्यात सर्वात जास्त अर्ज आले आहेत. तर जागेपेक्षाही कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. (Maharashtra News)

RTE Admission
Jalgaon News: अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, माफ करा..सुसाईड नोट लिहत संपविले जीवन

आरटीई प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात आली. यंदा अर्ज संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लॉटरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे.

RTE Admission
Jalgaon Crime News: झोपेतच केला महिलेवर अत्‍याचार; जळगावातील धक्‍कादायक प्रकार

राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले होते. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दूजाभाव केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी शिक्षण विभागाकडे तशी तक्रार करावी.

RTE Admission
Nandurbar News: नंदुरबार दंगल प्रकरणी २७ जणांना अटक; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

राज्यातील प्राथमिक शाळेचं कॉलेज प्रमाणे मूल्यांकन होणार आहे. पुढील वर्षी पासून मूल्यांकन होणार आहे. या शाळेसाठी निकष ठरले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार असून ज्या शाळेचा आरटीई अनुदान थकले आहेत ते लवकर दिलं जाणार; अशी माहिती प्रधान सचिव यांनी दिली आहे. तसेच ज्या शाळांमध्ये मुलांवरती दुजाभाव केला जाईल, अशा शाळांच्या लेखी तक्रारी आल्यावर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर अनुदान थकलेल्या शाळांनाही अनुदान लवकर जमा होईल अशी माहिती प्रधान सचिव देवल यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com