Ashadhi Wari: ओतुर ते देहू-आळंदी महिलांची सायकलवारी

ओतुर ते देहू-आळंदी महिलांची सायकलवारी
Dehu Alandi
Dehu AlandiSaam tv

पुणे : ओतूर येथील राजसुर्य फाउंडेशनच्यावतीने ओतूर ते श्रीक्षेत्र आळंदी (Alandi) आणि देहू अशा सायकलवारीचे प्रस्थान आज पहाटे साडेपाच वाजता ओतूर येथून झाले. (pune news Otur to Dehu Alandi women's cycling)

Dehu Alandi
बसचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी; चरणमाळ घाटात अपघात

कोरोना (Corona) महामारीच्या काळापासुन अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या दुर करण्यासाठी व्यायामाची सवय व्हावी; यासाठी सायकल चलाओ आरोग्य बचाओ हि मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी जुन्नरमधील महिलांनी पुढाकार घेत सायकलवारी घेण्यात आली.

"सायकल चलाओ, आरोग्य बचाओ" तसेच "पर्यावरण संवर्धन व संरक्षण" अशा संदेश देणारी ही सायकलवारी श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर्ताचे दर्शन घेऊन नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन ही सायकलवारी पुढे आळंदी व देहूकडे रवाना झाली. दहा महिला या सायकलवारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. सायकलवारीत सहभागी झालेल्या या सर्व महिलांचा नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन नारायणगावच्या प्रवेशद्वारावर सत्कार करण्यात आला. त्यानंतर ही सायकलवारी आळंदी आणि देहूकडे रवाना झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com