Prakash Ambedkar: द्वेष भावनेतून राहुल गांधींची खासदारकी रद्द; प्रकाश आंबेडकर

द्वेष भावनेतून राहुल गांधींची खासदारकी रद्द; प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam tv

पुणे : राहुल गांधी अपील करणार आहेत त्या आधी खासदारकी (rahul Gandhi) रद्द केली, याचा निषेध करतो. मुळात सुरत सत्र न्‍यायालयाने शिक्षा सुनावल्‍यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती केली नसती; तर निर्णय घ्यायचा होता. परंतु, या निर्णयातून द्वेष भावना दिसत असल्‍याची प्रतिक्रीया वंचित बहुजन आघाडीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली. (Breaking Marathi News)

Prakash Ambedkar
Nagpur News: हमाली काम करणाऱ्याकडे आढळला देशी कट्ट्यासह काडतूस

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, की सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली होती. यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर केले होते, की उच्‍च न्‍यायालयात अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो.

Prakash Ambedkar
Harshvardhan Jadhav: चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटात जायचे होते मात्र..; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट

वाट बघायला हवी होती

सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का? याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com