पुणे पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन'; साडेतीन हजार गुंडांची केली झाडाझडती, त्यानंतर...

पुणे पोलिसांनी सीआरपीसी कायद्याप्रमाणे ८० आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन'; साडेतीन हजार गुंडांची केली झाडाझडती, त्यानंतर...
Pune PoliceSaam Tv

पुणे : पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरात कॉम्बिंग ऑपरेशन (combing operation) राबवत साडे तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत साडेतीन हजारांपैकी ६८५ गुन्हेगार (culprit arrested) पोलिसांच्या ताब्यातही आले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुल, काडतुसे, शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच चंदननगरमधील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक केलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Pune Police
विधानपरिषदेची निवडणूक होणारच; शेवटच्या क्षणी भाजपकडून 'ही' खेळी

शहरात लुटमार, घरफोड्या, वाहनांच्या चोऱ्या आणि हाणामारीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलीसांकडून हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पुणे पोलिसांनी ही मोहीम शनिवारी रात्री अचानक राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी सीआरपीसी कायद्याप्रमाणे ८० आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी १४ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. तसेच शहरातील ३९१ हॉटेल्स, ढाबे, लॉजेस तसेच एसटी स्टँड,रेल्वे स्थानकांची पोलिसांनी तपासणी केली आहे. ७०३ वाहने तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, वाहतूक विभागाने ४९२ संशयित वाहनचालकांची तपासणी करुन २७६ दुचाकींवर, १९ तीन चाकी व १९७ चारचाकींवर कारवाई केली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com