Pune News: पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ६ पोलीस कर्मचारी निलंबित; काय आहे प्रकरण?

Railway Police Personnel Suspend: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे साहित्य, पिशव्या तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
Pune News
Pune NewsSaam tv

सचिन जाधव

Pune News: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे साहित्य, पिशव्या तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. सहायक पोलीस फौजदार बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनवणे अशी निलंबत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

सहा पोलीस कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ३ एप्रिल रोजी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडील साहित्य आणि पिशव्या तपासणीचे काम देण्यात आले होते.

Pune News
Nagpur Crime News: पतीने केली पत्‍नीची हत्‍या; घरगुती वादाचे कारण

दुपारी पावणे एकच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवरात एका युवक आणि त्याच्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून चौकशी सुरु केली.याच प्रकरणावरून चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.

चौकशीत युवक आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेण्यात आले.त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले अशी माहिती मिळाली होती लोहमार्ग पोलीसानी आवहाल दिला व कारवाई करण्यात आली आहे.

सहायक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांनी कसुरी केली तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकानी दिली आहेत.

Pune News
Manish Sisodia's Letter: 'भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणं महत्वाचं', मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून मोदींना लिहिलं पत्र

काय आहे प्रकरण?

सहायक पोलीस फौजदार बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनवणे हे सहा पोलीस कर्मचारी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. ३ एप्रिल रोजी यांनी या ६ पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला अडवून चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

या पोलिसांनी या चौकशीत या तरुण आणि मैत्रिणीकडून ५ लाख घेऊन सोडण्यात आले. ही माहिती लोहमार्ग पोलिसांनी मिळाली. पोलीस दलाची प्रतिमा मलिन ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी या ६ जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले. (Breaking Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com