पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला!

नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला!
पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला!अॅड, जयेश गावंडे

अकोला : अमरावती जिल्ह्यातील (Amravati) काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला (Purna River) मोठा पूर आला असून अकोला (Akola) जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोला- अकोट महामार्ग (Akola-Akot Highway) बंद झाला आहे. गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. Purna river is flooded

हे देखील पहा-

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला!
गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आजपासून 'मोदी एक्स्प्रेस'

पूर्णा नदीला मोठा पूर आला असून अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामध्ये अकोट- अकोला महामार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाच्या पाच फूट वरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोल्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटलाय. तर बैतुल कडे जाणारा मार्गही बंद झालाय. दरम्यान या पुलावरून प्रवास करणे टाळावे तसेच परिसरातील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com