पिककर्जाच्या उद्दिष्टात अद्याप वाढ नाही; सहकार आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

नाबार्डच्या २०२१- २२ संभाव्य ऋण आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यात शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपासाठी दोन हजार ६३६ कोटी रुपयाचे उद्दिष्ट नाबार्डने ठरवून दिले होते.
पिककर्जाच्या उद्दिष्टात अद्याप वाढ नाही; सहकार आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
पिक कर्ज मिळेना, शेतकरी त्रस्त

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : राज्याच्या सहकार आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना (सहकारी संस्था) ता. २७ मे रोजी पत्र पाठवून नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍याची पीक कर्जाची घेण्याची क्षमता आहे. यात ५०० कोटी रुपयांची वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जिल्हा अग्रणी बँकेकडून अद्याप लक्षांकात वाढ केली नसल्यामुळे सहकार आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.

नाबार्डच्या २०२१- २२ संभाव्य ऋण आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यात शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपासाठी दोन हजार ६३६ कोटी रुपयाचे उद्दिष्ट नाबार्डने ठरवून दिले होते. पण जिल्हा अग्रणी बँकेकडून नाबार्डच्या आराखड्याला कात्री लावत बँकांना एक हजार १५६१ कोटी रुपयाची उद्दिष्ट देण्यात आले. यामुळे यंदा तब्बल ९८९ कोटी रुपयाने उद्दिष्ट कमी करण्यात आले. परंतु राज्याच्या सहकार आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना (सहकारी संस्था) ता. २७ मे रोजी पत्र पाठवून नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍याची पीक कर्जाची घेण्याची क्षमता आहे. यात ५०० कोटी रुपयांची वाढ करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - कोरोना : नांदेड जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 788 ची तपासणी

यासोबतच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या पीक कर्जाच्या उद्दिष्टांमध्ये वाढ करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून जिल्हा अग्रणी बँकेला आढावा बेठकीत पिककजाचे उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली. असे असताना जिल्हा अग्रणी बँकेने मात्र राज्याच्या सहकार आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत उद्दिष्टात अद्याप वाढ केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ करण्याच्या लेखी सुचना जिल्हा अग्रणी बंकेला दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांनीही आढावा बेठकीत तशा सुचना दिल्या आहेत. पुढील काळात उद्दिष्टात वाढ होईल.

- अनिल चव्हाण, जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था ), नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com