Satara : तारळी पाटबंधारे खटाव उजवा कालवा अस्तरीकरणास ग्रामस्थांचा विरोध; जाणून घ्या नेमंक कारण

जमीनी आमच्या जाणार असून अस्तरीकरण झाल्यास पुन्हा आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
satara
satarasaam tv

Satara News : पुसेसावळी, थोरवेवाडी ग्रामस्थांनी तारळी पाटबंधारे खटाव उजवा कालवा अस्तरीकरणास एकमुखाने विरोध दर्शविला आहे. विशेष ग्रामसभेत सर्वांनी मिळून शंभर टक्के विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. (Maharashtra News)

satara
Bribe : दारू-मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

सातारा (satara) जिल्ह्यातील पुसेसावळी (pusesavali), थोरवेवाडी (thorewadi) आणि लक्ष्मीनगर (laxminagar) यांची एकत्रित पणे असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना दररोजच्या सुमारे ९ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून ग्रामपंचायतीकडून फक्त एक लाख लिटर पुरवठा करणारी पाण्याची टाकी उपलब्ध आहे. त्यामुळे इतरच्या जास्तीच्या लागणाऱ्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आणि परिणामी शासनाला टॅंकरसह इतर घटकांवर ज्यादाचा खर्च करावा लागतो.

satara
Udayanraje Bhosale : त्यावेळेस तुमचंही लाेक पेंटिंग काढतील : उदयनराजे भाेसले

अधिका-यांचा आराेप चुकीचा

हा कॅनॉल कार्यरत झाले पासून शेतकऱ्यांनी आजपर्यंत २२५०/- रू तासाचे भरून विकत पाणी घेत असून कोणत्याही प्रकारची चोरी करत नसताना संबंधित अधिकारी चुकीचे आरोप करत असल्यानेच ५/३/२०२३ रोजी पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत थोरवेवाडी ता. खटाव जि.सातारा येथील लाभधारक शेतक- यांनी पुसेसावळी हद्दीमधील खटाव उजवा कालवा (सा.क्र.४/२००) या ठिकाणी थोरवेवाडी आणि पुसेसावळी येथील ग्रामस्थांनी अस्तरीकरणाच्या कामास विरोध करुन काम बंद केलेले आहे.

ग्रामसभेत ठराव मंजूर

जमीनी आमच्या जाणार असून अस्तरीकरण झाल्यास पुन्हा आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. यामुळे अस्तरीकरणाचे कामास शेतकऱ्यांचा विरोध असून विशेष ग्रामसभेत सर्वांनी मिळून विरोध दर्शविला असून त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com