मावळ : पोलिस ठाणे, भुमी अभिलेखसह तहसीलचे तात्पूरते स्थलांतर

मावळ : पोलिस ठाणे, भुमी अभिलेखसह तहसीलचे तात्पूरते स्थलांतर
vadgaav maval

मावळ : वडगाव मावळ येथे नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम सुरू करण्यासाठी आपले कार्यालय एका महिन्यात खाली करून इतर ठिकाणी हलवण्याची कार्यवाही करावी असे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, वनविभाग, भूमिअभिलेख कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. (pwd-orders-maval-tashil-police-forest-shift-offices-sml80)

त्यामुळे या चारही कार्यालयाला आपले संसार दुसरीकडे हलविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यांना जागेची शोधाशोध करावी लागणार आहे.

वडगाव मावळ vadgaav maval येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, वन विभाग कार्यालय, भुमी अभिलेख ही चारही कार्यालय ब्रिटिश कालीन इमारतीमध्ये आहेत. ही इमारत साधरणतः 1889 साली बांधण्यात आली आहे. आता या कार्यालयात बसण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचा-यांसाठी निवासस्थानेही नाही. नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी शासनाची मान्यताही मिळाली आहे. कामाची निविदा तातडीने पूर्ण करून इमारत बांधकाम हाती घेण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

vadgaav maval
वाढदिनापुर्वीच अजित पवारांचे ग्रामपंचायतींना रिटर्न गिप्ट

आता असलेल्या तहसील कार्यालय, वन अधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे, भुमीअभिलेख ही चारही कार्यालय पाडून एकाच इमारतीत बांधकाम करण्याची मंजुरीही मिळाली आहे. त्याकरिता ही चारही कार्यालयांना त्याचे सर्व सामान एका महिन्यात हलविण्याची कार्यवाही करावी तसे पत्रही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे या चारही कार्यालयांना जागा देता का कुणी जागा अशी वेळ येथील अधिकाऱ्यांवर आली आहे.

वडगाव मावळ येथील चारही शासकीय कार्यालय हे ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशांनी बांधलेले नदीवरील पूल बंधारे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बांधलेला पुल हे ब्रिटिशांनी बांधलेल्या कामाचे साक्ष देत आहे.  दीडशे वर्ष होऊनही मोठ्या दिमाखात उभे आहेत. मात्र आता होत असलेली इमारत कशा पद्धतीने होणार याकडेच सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com