विद्यार्थ्यांमध्ये HIV AIDS बाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम

जिल्हा ग्रामीण रुग्णालय एड्स नियंत्रण विभाग व युवारंग फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने India@75 अंतर्गत एस ए मिशन महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये HIV AIDS बाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम
विद्यार्थ्यांमध्ये HIV AIDS बाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमदिनू गावित

नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही (HIV) कोरोना (Corona) व इतर सांसर्गिक आजारांबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा ग्रामीण रुग्णालय एड्स नियंत्रण विभाग व युवारंग फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने India@75 अंतर्गत एस ए मिशन महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचे पाच गट करून एचआयव्ही या विषयावर प्रश्न विचारण्यात आले.

हे देखील पहा :

स्पर्धेत सहभागी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक पटकावलेल्या अलिना परायील व रिया वासवाणी या विद्यार्थिनींना पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या भाविनी साळवे व जागृती देवरे यांना दोन हजार रुपये रोख व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक पटकावलेल्या जयेश देवरे व दिपक बडगुजर यांना एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये HIV AIDS बाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम
Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!

शालेय विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही एड्स, कोरोना तसेच इतर आजारांबाबत अधिक जनजागृती व्हावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अभ्यास केला पाहिजे असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. राजेश वळवी यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी रमाकांत पाटील, डॉ. नितीन मंडलिक, विश्वास सूर्यवंशी, नुतनवर्षा वळवी, सी.पी. बोरसे युवारंग फाउंडेशन चे उपाध्यक्ष देवेंद्र कासार, सचिव राहुल शिंदे आदी सदस्य उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.