Beed News: हळद लागलेल्या हाताला ठोकल्या बेड्या; बीडमध्ये लुटारू नवरीसह रॅकेटचा पर्दाफाश

बनावट लग्न लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
Beed News
Beed Newsविनोद जिरे, बीड

विनोद जिरे, बीड

Beed News: आतापर्यंत लग्नाळू नवरदेवांना लुटणाऱ्या अनेक नवऱ्या पाहिल्या असतील. लग्न केल्यानंतर काही दिवस त्या नवऱ्याजवळ राहून त्याला लुटूनही गेल्या आहेत. मात्र 3 लाख रुपये देऊन हौसेनी नवरी आणली, तिची हौसमौस करावी वाटली.. मात्र ही हौसेने आणलेली नवरी दुसऱ्याच दिवशी बावरी झाली आणि त्यानंतर या लग्नाळू नवरदेवांना लुटणाऱ्या नवरीचा, बीड शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. (latest Marathi News)

बीडमधील लग्नाळू तरुणाला खासगी एजंटने स्थळ आणले. पसंती झाल्यावर मुलीच्या आईला नवरदेवाने अडीच लाख देण्याची तयारी दर्शवली. ५ डिसेंबरच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील वसमत येथे नोटरी करून करारपत्रक करून विवाह लावला.. परंतु दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री नवरीने मला इथे राहयचे नाही. मी आत्महत्या करेल किंवा घरातील कुणाला तरी मरेल अशी धमकी वजा टूम सुरु केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मैत्रिणीच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यातून बनावट लग्न लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

त्याचं झालं असं, की बीडच्या आष्टी तालुक्यातील ३२ वर्षीय नवनाथ हा बीडमध्ये सायकल मार्ट चालवून उदरनिर्वाह करतो. वयाची बत्तीशी ओलांडल्यावरही लग्न होत नसल्याने तो बेचैन होता. बीडमध्ये बहिणीच्या घरी तो राहतोय. बहीण व मेहुण्याने त्याच्यासाठी वधुशोध सुरु केला, तेव्हा त्यांना एजंट नाना पाटील नुरसारे याच्याकडे भरपूर स्थळ असल्याची माहिती समजली. त्यामुळे दोघांनी त्याच्याशी संपर्क केला.

3 डिसेंबरला बहिणीच्या घरी बैठक झाली, त्यात नाना पाटील नुरसारे याने नवनाथला दुर्गा बालाजी माने या तरुणीचा फोटो दाखवला. फोटोत नवनाथने तिला पसंत केल्यावर नाना पाटील नुरसारे यांनी ती हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील सिद्धार्थनगरातील रहिवासी असून, तिला वडील नसल्याचे सांगितले. त्यामुळं तुम्हाला लग्नासाठी अडीच लाख रुपये मुलीच्या आईला द्यावे लागतील, अशी अट नुरसारे यांनी घातली. दोन दिवसांत पैशांची तजवीज करून ५ डिसेंबरला मुहर्त ठरला.

अन विवाह परभणी जिल्ह्यातील वसमत येथे करण्याचे निश्चित झाले. वसमत येथे १०० रुपयांच्या मुद्रांकावर दुर्गा माने हिचा नवनाथशी विवाह करारनामा केला. पुष्पहार व मणी मंगळसूत्र घालून विवाह लावल्यानंतर दुर्गाला घेऊन नवनाथ हा मोठ्या हौसेने बीडला पोहोचला. त्याआधी अडीच लाख रुपये देखील दिले, मात्र मध्यरात्रीच दुर्गाने आपलं रूप दाखवलं आणि मी आत्महत्या करेल किंवा घरातील इतरांना मारेल असे ती म्हणू लागली.

त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी सकाळी दुर्गाची मैत्रीण मीना बळीराम बागल २७ , रा. छोटेवाडी, ता. माजलगाव ही बीडला पोहोचली. तिने नवनाथच्या मेहुण्यास फोन करून दुर्गाला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले असून, बसस्थानकात (Bus Stop) तिला घेऊन या, असे सांगितले. मेहुण्याने नकार दिल्यावर घर शोधत ती दुर्गाजवळ पोहोचली. यावेळी पसार होण्याच्या तयारीत असतानाच दुर्गासह मीनाला नवनाथने पकडले आणि हा सर्व प्रकार समोर आला.

याप्रकरणी नवनाथच्या फिर्यादीवरून मीना बळीराम बागल वय 27, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव, दुर्गा बालाजी माने 18, रा. मानवत, जि. परभणी, बालाजी भालेकर, मनकर्णा माने, आकाश माने, नाना पाटील नुरसारे सर्व रा. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, विनोद खिल्लारे रा. हिंगोली यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपीं पैकी नवरी दुर्गा बालाजी माने हिच्यासह मीना बागल या मैत्रिणीला बीड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान यामध्ये मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस (Police) निरीक्षक रवी सानप यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com