शंकराचार्य सरस्वतींना काँग्रेसी म्हटल्यावरून शास्त्रार्थ सभेत राडा; महाराजांवर उगारला माईक

नाशिकमध्ये हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शास्त्रार्थ सभेच आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत साधु महंतांमध्ये जोरदार वाद झाला आहे.
Nashik Shastrartha Sabha News
Nashik Shastrartha Sabha NewsSaam TV

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) आज हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेत, साधु महंतांमध्येच आसन व्यवस्थेवरुन जोरदार वाद झाला आहे. शिवाय या सभेत महाराजांनी एकमेकांवर माईक देखील उगारला आहे.

मागील अनेक दिवसांपासून हनुमान जन्मभूमीवरून (Hanuman Birth Place) नवा वाद सुरु झाला आहे. कर्नाटकातील किष्किंधा (Kishkindha) ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद महाराजांनी केला होता. शिवाय त्यांनी नाशिकचे (Nashik) अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना दिलं होतं याच पार्श्वभूमिवर आजची ही सभा आयोजिक करण्यात आली आहे.

मात्र, ही शास्त्रार्थ सभा सुरु होण्यापुर्वीच हनुमान जन्मभूमीवरून चर्चा होणं अपेक्षित असताना चर्चा राहिली बाजूला आणि सभेत वर आणि खाली कोणी बसायचं, यावरुनच नाशिकचे साधू-महंत आणि गोविंदानंद यांच्यामध्ये वाद झाला. एवढचं नव्हे तर यावेळी महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्यामुळे, या शास्त्रार्थ सभेत साधू महंतांमध्ये राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सुधीरदास यांनी शंकराचार्य सरस्वतींना काँग्रेसी म्हटल्यावरून हा वाद सुरू झाला. शिवाय जगद्गुरूंचा अपमान केल्याने सुधीरमहंत यांनी माफी मागावी अशी मागणी गोविंदानंद महाराजांनी केली.

Nashik Shastrartha Sabha News
Prithviraj: अक्षय कुमार, मानुषी छिल्लर गंगाघाटावर; चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना

दरम्यान, गोविंदानंद यांनी इतर साधू महांतांसोबत खाली बसण्यास होकार दिल्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली. ही सभा जवळपास तीन ते साडे तीन तासापासून ही चर्चा सुरू होती. यामध्ये साधू महांतांकडून दावे आणि प्रतिदावे केले गेले, त्यासाठी ब्रह्मपुराणसह अन्य काही कागदपत्रांचा दाखला देत, अंजनेरीच हनुमान जन्म स्थान असल्याचा नाशिकच्या साधू, महंतांचा दावा केला, तर गोविंदानंद महाराज हे किष्किंधा हीच खरी जन्मभूमी असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान वादामुळे आता सभा स्थगित करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com