Radhakrishna Vikhe Patil : यांचं कुकर बंद पडलंय, त्यात काही शिजणार नाही; विखे पाटलांची थोरातांवर टीका

Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही टीका केली आहे.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil saam tv

>>सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका केली आहे. यांचं कुकर बंद पडलंय, त्यात काही शिजणार नाही असा टोला विखे पाटलांची थोरातांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी थोरात यांनी सत्तेचा दुरुपयोग होत असून जिल्ह्यात कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे अशी टिका केली होती. त्याला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते संगमनेरमध्ये बोलत होते.

'संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय. मात्र आपण या त्रासाला पुरून उरणारे आहोत. तुमच्या दहशतीचे झाकण उडणार आहे' अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली होती.

त्याच्या टिकेला उत्तर देताना 'यांच कुकर बंद पडलंय, त्यात काही शिजणार नाही, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी मी खंबीर आहे अशा शब्दात विखे पाटलांनी थोरातांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

Radhakrishna Vikhe Patil
Mumbai Congress : आमचा हात मोडला, आता जोडायचं काम सुरुय; थोरातांच्या शाब्दिक कोटीवर पटोलेंचा कडक रिप्लाय

बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत वयोश्री योजनेच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विखे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

'हे सरकार उद्या पडेल, परवा पडेल असे अनेक जण सांगतात. सध्या अनेक भविष्यकार झाले असून रस्त्यावर बसणारे पोपट वाले मात्र यांच्यावर नाराज झालेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ कशाला आणता' असा मिश्किल टोला विखेंनी लगावला. तसेच पुढच्या निवडणुकीत देखील हेच सरकार पुन्हा येईल यात शंका नाही असेही विखे पाटील म्हणाले. (Maharashtra Political News)

Radhakrishna Vikhe Patil
SSC HSC Exam: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेत वेळ वाढवून मिळणार

अजित पवारांवरही टीका

अहमदनगर जिल्ह्याला केंद्राच्या जलजीवन योजनेतून साडेचार कोटी रुपये मिळाले. मात्र ज्यांचा काही संबंध नाही असे काही मंडळी गावोगावी आपले फोटो छापत आहेत अशी टीका विखे पाटलांनी अजित पवारांचे नाव न घेता केली. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन केले होते. यावरून विखे पाटलांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com