Radhakrishna Vikhe Patil : ...तर सत्यजित तांबे काँग्रेसमधून बाहेर पडतील; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाकीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीड कडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची घेतली भेट घेतली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSaam Tv

सचिन बनसोडे

शिर्डी - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीड कडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची घेतली भेट घेतली. यावेळी तिळगुळ देऊन विखे पाटलांनी फडणवीसांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

तर दोघांमध्ये काहीवेळ खाजगीत चर्चा देखील झाली. फडणवीस आणि विखे यांच्यात नाशिक पदवीधर उमेदवारासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी मीडियाशी संवाद साधला.

Radhakrishna Vikhe Patil
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांचे निवडणूक आयोगाला पत्र; नेमकं काय आहे कारण?

काँग्रेसच्या निष्ठा आणि इतर बाबतीत बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा ज्ञान पाझळलंय. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरात घेतली पाहिजे असा टोला विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) बाळासाहेब थोरात यांना लगावलाय.

शुभांगी पाटील यांच्याबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक उमेदवार आपला पर्याय शोधत असतो. महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी उमेदवार शोधलाय. उद्या भाजपाने सत्यजित तांबेना पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे विखे म्हणाले.

पक्षाच्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेसची (Congress) वाटचाल सुरू आहे. भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हे तर राहुल गांधींसाठीच असून स्वतःची छबी वाढवण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आलाय. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची अशीच अवस्था आहे. सुजय विखें प्रमाणेच सत्यजित ही बाहेर पडेल असं मला वाटतंय असे वक्तव्य करत विखे पाटलांनी पदवीधरसाठी सत्यजित तांबेंच भाजपचे (BJP) उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
Satyajit Tambe: 'शार्क टँक'ची भुरळ सत्यजित तांबेंनाही, 'त्या' पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष...

गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्यांमूळे महाराष्ट्रात भाजपाचा बोलबाला झाला. नाराज होऊन पंकजा मुंडे काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. सत्ता येते जाते, पद मिळतात मिळत नाही, मात्र पक्षासाठी पंकजा मुंडे यांचं योगदान मोठं असल्याचे विखे पाटील म्हणाले.

अब्दुल सत्तार यांना टार्गेट करून एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही अब्दुल सत्तार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू हे मला माहित नाही मात्र अब्दुल सत्तारांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगत विखे पाटलांनी सत्तार यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com