राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना लुटलं; रघुनाथदादा पाटील

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना लुटलं; रघुनाथदादा पाटील
raghunathdada patil

अमरावती : पूरग्रस्त भागातील शेतक-यांना सरकारने लवकर मदत न केल्याने त्यांच्यावर भिक मागण्याची वेळ येऊ शकते. राज्यकर्ते केवळ शेतक-याला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी आंदाेलन छेडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी नमूद केले. raghunathdada-patil-visited-farms-floods-amravati-marathi-news-sml80

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे आजपासून (रविवार) पाच दिवस विदर्भातील शेतक-यांच्या बांधावार जाणार आहेत. पाटील हे त्यांच्या दौऱ्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या नुकसानाची माहिती घेणार आहेत. प्राथमिक स्तरावर येथे माेठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले असून सरकारने लवकर मदत न केल्याने टीका देखील केली आहे.

 raghunathdada patil
शरीरसुखास विराेध; पत्नी दिशा ठाकरेचा संताेषने केला खून

रघुनाथदादा म्हणाले केंद्र व राज्य सरकारवर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले आहे. सातत्याने केवळ आश्वासन देताहेत त्यामुळे आता सरकारचे काही एक ऐकून घेतले जाणार नाही. राज्याचे मंत्री व नेते बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. परंतु त्यांना तेथे आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. आश्वासनाची पूर्तता होत नाही त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी केले आहे.

निसर्गाची अवकृपा झाल्याने शेती व शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. दरम्यान रघुनाथदादांनी सरकारवर हल्लाबोल करत आगामी काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.