
Rahul Gandhi Remark On Veer Savarkar : शेगाव : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद आणि प्रेम दिलेलं आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इतिहासात काय घडलं होतं याकडं लक्ष देण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा, असा सल्ला देतानाच राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं विधान शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी स्पष्ट भूमिका मांडली. (Maharashtra News)
सावरकारांच्या (Veer Savarkar) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोडो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे, असे रमेश म्हणाले.
राहुल गांधींच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता
भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे रमेश यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेत नारीशक्ती
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या, १९ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी घेतला होता. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीचे दर्शन भारत जोडो यात्रेत होईल, असेही ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.