Rahul Gandhi's reaction on result: गरिबांच्या शक्तीचा विजय, पैशांच्या ताकदीचा पराभव, कर्नाटक निकालावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकच्या या निकालावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हा गरिबांच्या शक्तीचा विजय आणि पैशांच्या ताकदीचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Karnataka Assembly Election Result 2023
Karnataka Assembly Election Result 2023saam tv

Rahul Gandhi's reaction to the Karnataka result: कर्नाटक विधासभा निवडणूकीत काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातील हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेसने कर्नाटकमध्ये 135 जागांवर आघाडी मिळवली आहे.

कर्नाटकात बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकते. कर्नाटकच्या या निकालावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हा गरिबांच्या शक्तीचा विजय आणि पैशांच्या ताकदीचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Karnataka Assembly Election Result 2023
DK Shivkumar: एक दिवस प्रचार अन् 1 लाखांनी विजय! पंतप्रधानांचाही पराभव; कोण आहेत जायंट किलर DK शिवकुमार?

राहुल गांधी यांनी यावेळी कर्नाटकच्या जनतेचे आभार देखील मानले. राहुल गांधी म्हणाले, सर्वात आधी कर्नाटकातील जनतेचे, या विजयासाठी ज्यांनी परिश्रम घेतल्या त्या पक्षातीस सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आणि खूप खूप अभिनंदन. आज कर्नाटकात गरिबांच्या शक्तीने पैशांच्या ताकदीचा पराभव केला आहे.

आम्ही तिरस्कारातून ही लढाई लढली नाही, आम्ही प्रेमाने ही लढाली जिंकली. कर्नाटकच्या जनतेने प्रेमाला विजयी केले आहे. त्यामुळे आता कर्नाटकात तिरस्काराचा बाजार बंद झाला असून प्रेमाची दुकानं उघडली आहेत. जी आश्वासने आम्ही निवडणुकीत दिली, ती पूर्ण करण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करू असे राहुल गांधी म्हणाले. (Latest Political News)

Karnataka Assembly Election Result 2023
Sharad Pawar On Karnataka Election Result: 2024 च्या निवडणुकांमध्ये देशात काय होईल? कर्नाटक निकालावरून शरद पवार यांनी दिले महत्वाचे संकेत

भाजपवर जनतेचा रोष - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (NCP Leader Sharad Pawar) मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला निकारले आहे.

मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.' तसंच, कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी काँग्रेसपक्ष आणि उमेदवाराचे अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com