मालेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा

रात्री उशिरा रझा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आहे.
मालेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा
मालेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; रझा अकादमीच्या कार्यालयावर छापाSaam TV

नाशिक: मालेगाव हिंसाचार प्रकरण आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहे. मालेगाव शहरातील रझा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा टाकला आहे. रात्री उशिरा रझा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आहे. कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी रझा अकॅडमीने बंदची हाक दिली होती. बंदच्या दरम्यान हिंसाचार झाला होता. हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे तसेच संशयितांची संख्या 41 वर पोहोचली आहे.

मालेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा
मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...

दरम्यान त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या नावाखाली राज्यात मालेगाव, अमरावतीमध्ये बंद पाळण्यात आला होता. त्या बंद दरम्यान हिंसाचार झाला. दगडफेक, जाळपोळ झाली. या हिंसाचाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बंद पाळण्यात आला, भाजपने मोर्चा काढला त्यालाही गालबोट लागले आणि पुन्हा हिंसाचार उफाळला. त्यानंतर राज्यात अमरावती, मालेगाव, पुणे ग्रामीण, सांगली याठिकाणी जमावबंदी लावण्यात आली. तेव्हा कुठतरी हिंसाचार शांत झाला. त्यानंतर राज्यसरकार आणि विरोधी पक्ष एकाच अकादमीवरती टीका करु लागले ती म्हणजे रझा अकादमी.

राज्य सरकारच्यावतीने रझा अकादमी हे भाजपाचं पिल्लू आहे अशी टीका केली तर हिंसाचार होण्याच्या अगोदर भाजपचे नेते रझा अकादमीच्या कार्यालयात हजर असल्याचीही टीका केली होती. त्यानंतर भाजपने पलटवार केला. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सरळ चॅलेज दिलं आणि म्हणाले रझा अकादमी जर भाजपचं पिल्लू असेल तर ते ठेचून टाका. आता रझा अकादमीच्या कार्यलयांवर छापे पडायला सुरुवात झाली आहे. त्यातून हिंसाचार करणारे खरे कोण हे लवकरच बाहेर येईल.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com