राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्यांदा अव्वल!

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात रायगड जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात ३४ हजार ६५८ प्रकरणात सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्यांदा अव्वल!
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्यांदा अव्वल!SaamTv

राजेश भोस्तेकर

रायगड : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात रायगड जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात ३४ हजार ६५८ प्रकरणात सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात न्यायालयांतील प्रलंबित  प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती.

हे देखील पहा -

रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबित अशी जिल्ह्यातील एकूण ९२ हजार ३३२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३३ हजार २२० दाखलपूर्व तर १ हजार ४३८ दाखल प्रकरणे, अशी एकूण ३४ हजार ६५८ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला.

महत्वाची बाब म्हणजे या निकाली काढण्यात आलेल्या ३४ हजार प्रकरणातून पक्षकारांना एकुण १६ कोटी ९१ लाख २२ हजार ८३५ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली. मोटार अपघात प्रकरणातील ७३ प्रकरणे मिटवून २ कोटी ६९ लाख २७ हजार रूपयांची  नुकसान भरपाई मयताच्या वारसांना मंजूर करण्यात आली. तसेच कौटुंबिक कलहाची ७१ प्रकरणे व पाणी पट्टी वसूलीची १० हजार ४३३ वादपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत ४० लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्यांदा अव्वल!
बीडमध्ये १०४ बालविवाह रोखण्यात यश!

लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करून सुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, रायगड, पोलीस विभाग, विधिज्ञ व सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे व न्यायाधिश तथा सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com