रायगड जिल्ह्याचा 99.73 टक्के निकाल; जिल्ह्यात 99 विदयार्थी नापास

रायगड जिल्ह्याचा ९९.७३ टक्के इतका निकाल लागला असून तळा तालुक्याचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर जिल्ह्यात ९९ मुले ही नापास झाली आहेत.
रायगड जिल्ह्याचा 99.73 टक्के निकाल; जिल्ह्यात 99 विदयार्थी नापास
रायगड जिल्ह्याचा 99.73 टक्के निकाल; जिल्ह्यात 99 विदयार्थी नापासSaam Tv

रायगड - दहावीच्या परीक्षेचा Exam निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. रायगड Raigad जिल्ह्याचा ९९.७३ टक्के इतका निकाल लागला असून तळा तालुक्याचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर जिल्ह्यात ९९ मुले ही नापास झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. बोर्डाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल बघण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागले होते.

हे देखील पहा -

कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत यंदा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. ३७ हजार ३०१ विद्यार्थी यंदा रायगड जिल्ह्यातून १० वीच्या परीक्षेसाठी बसले होते.

रायगड जिल्ह्याचा 99.73 टक्के निकाल; जिल्ह्यात 99 विदयार्थी नापास
बांधकाम नियमित करा अन्यथा बांधकामावर हातोडा- आयुक्त मित्तल

तर यातील ३७ हजार २०२ विद्यार्थी पास झाले आहे. उर्वरित फक्त ९९ विद्यार्थी नापास झाले आहेत. तळा तालुक्यात ३६७ विद्यार्थ परीक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळेतील विध्यर्थंना २३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विभागीय मंडळाकडे शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण पाठविण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com