Bullock Cart Race: नांदगावात भाजप पदाधिकाऱ्याच्या वाढदिवशी ठेवलेल्या बैलगाडा शर्यतीत अपघात, तिघे जखमी

बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (2 फेब्रुवारी) सायंकाळी घडली.
Bullock Cart Race
Bullock Cart RaceSaam Tv

राजेश भोस्तेकर -

रायगड : बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (2 फेब्रुवारी) सायंकाळी घडली. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती (Raigad Nandgaon Accident In Bullock Cart Race Three Injured).

Bullock Cart Race
Nashik: शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले, तोल जाऊन थेट 110 फूट खाली कोसळले, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला.

Bullock Cart Race
Accident: खामगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, उभ्या ट्रेलरवर ट्रक आदळला, दोन जण गंभीर जखमी

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली असली तरी प्रशासनाची परवानगी घेऊन अटी शर्तीवर शर्यती घ्यायच्या आहेत. नांदगाव बंदरात 2 फेब्रुवारी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बैलगाडा शर्यतीचे आयोजित केले गेले होते. त्यामुळे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात शर्यतप्रेमींची गर्दी झालेली होती.

त्याचवेळी शर्यत सुरु झाल्यानंतर एक शर्यतीची बैलगाडी ही दुचाकीवर उभ्या असलेल्या शर्यत प्रेमीवर घुसली आणि अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, शर्यत सुरू होताना नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नव्हते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com