Bus Accident: धावत्या बसचे मागचे चाक निखळले; प्रवासी बचावले

धावत्या बसचे मागचे चाक निखळले; प्रवासी बचावले
Bus Accident
Bus AccidentSaam tv

सचिन कदम

रायगड : मुंबई– गोवा महामार्गावरुन धावत असताना एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचे मागचे चाक अचानक निखळून अपघात झाल. तीन चाकांवर हि शिवशाही बस (MSRTC Bus) रस्त्यावर घासत काही अंतर जाऊन थांबली. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात मुंबई गोवा (Goa) महामार्गावर केंबुर्ली गाव हद्दीत घडला. (Raigad News Bus Accident)

Bus Accident
Tejaswin Shankar : फेडरेशननं डावललं, न्यायालयानं तारलं; तेजस्विन शंकरनं जिंकलं

मुंबई– गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जात असलेली शिवशाही बस मंडणगड नालासोपारा ही एसटी बस 40 प्रवाशांना घेऊन महाडकडुन मुंबईकडे (Mumbai) जात असताना हा अपघात (Accident) झाला. यामध्ये बसच्या उजव्या बाजुचे मागचे चाक एक्सलसह बाहेर पडून निखळले. यावेळी महामार्गावर वाहतुक देखील कमी असल्याने मोठ्ठी दुर्घटना होता होता टळली. तरी एसटी महामंडळाच्या मॅकॅनिक विभागातील दुर्लक्षीतपणा समोर आला आहे.

अन्‌ बसच्‍या पुढे चाक

बसचे मागचे चाक अचानक निखळले. यावेळी धावत्‍या बसच्‍या पुढे चाक गेल्‍याने अनेकांच्‍या काळजाचा ठोका चुकला होता. परंतु, बस चालकाचे प्रसंगावधान म्हणा की प्रवाशांचे सुदैव या अपघातामध्ये कोणातीही जीवीत हानी झाली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com