
रायगड : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. घरातील छोट्या मोठ्या वस्तु विकत घेण्यापासुन, तर मैत्री देखील ऑनलाईन केली जात आहे. या ऑनलाईन मैत्रीमुळे रायगड (Raigad News) जिल्ह्यातील अलिबाग येथील महिलेला तब्बल एक कोटी बारा लाख रुपयांचा गंडा घातला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत अलिबाग (Alibag) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असुन पोलिस तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)
सदर महिला ही अलिबाग येथील रायगड जिल्हा सत्र न्यायालयातील निवृत उच्चपदस्त अधिकारी आहे. तिने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार एका परदेशी नागरीकाशी फेसबुकवरून मैत्री झाली. तिच्या या फेसबुक मित्राने तिला सरप्राइज गिफ्टचे अमिष दाखवले. या सरप्राईज गिफ्टच्या अमिषात अडकलेल्या महिलेने या परदेशी मित्राने केलेल्या मागणीनुसार दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता गिफ्ट टॅक्स, गिफ्टमध्ये असलेली करन्सी (Cyber Crime) एक्सचेंज टॅक्स, कस्टम चार्जेस असे मिळून जवळजवळ एक कोटी बारा लाख रुपये एवढी मोठी रक्कमे ऑनलाईन पाठवुन दिली.
सरप्राइज गिफ्ट आलेच नाही
विषेश म्हणजे अनोळखी व्यक्तीला आपण येवढी मोठी रक्कम देतो; याबद्दल महिलेला संशय देखील आला नाही. मागणी केलेली रक्कम देऊन सुद्धा सरप्राइज गिफ्ट काही पोहचले नाही. त्यानंतर फसवणुक झाल्याचे समोर येताच पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली. घडला प्रकार सांगित तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करीत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.