रायगडमध्ये एसटीचा भीषण अपघात; संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली, ७ जखमी

जखमींवरती पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
Raigad ST Bus Accident
Raigad ST Bus Accidentसचिन कदम

सचिन कदम -

रायगड: रायगड जिल्ह्यातील (Raigad District) सुधागड तालुक्यात ब्रेकफेल झाल्याने एसटीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सुधागड तालुक्यातील महागाव फाट्यावरील सेरेनिटी फॉर्महाऊस जवळ झाला आहे.

सदर एसटी (ST Bus) बस खेमवाडी पेण असा प्रवास करत असातना बसचा ब्रेक निकामी झाला आणि एसटी रस्त्याशेजारी फार्म हाऊसच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. (Raigad ST Bus Accident)

शिवाय या बसचा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये १३ प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांपैकी ७ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. जखमींवरती पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) उपचार सुरू आहेत. दरम्यान, एसटीच्या अपघातांमध्ये वाढ होत असून महामंडळाने बसच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी आता प्रवाशांकडून येत आहे.

पुण्यात स्कुलबस गेली दरीत -

पुण्यातील (Pune) आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon) मुक्ताई प्रशाला पिंपळगावची स्कुलबस ४४ विद्यार्थ्यांना घेऊन गिरवली येथील आयुका दुर्बिण पाहण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना एका वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक आज घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com