Raigad Accident News: कार दुचाकीचा अपघात; खरवली काळीज ग्रामपंचायतीच्‍या माजी सरपंचाचा मृत्‍यू

कार दुचाकीचा अपघात; खरवली काळीज ग्रामपंचायतीच्‍या माजी सरपंचाचा मृत्‍यू
Raigad Accident News
Raigad Accident NewsSaam tv

सचिन कदम

रायगड : मुंबई– गोवा महामार्गावर महाड शहर हद्दीत कार व मोटरसायकलचा (Accident) अपघात झाला. यामध्ये खरवली काळीज ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमोद महामुणकर यांचे अपघाती निधन झाले आहे. (Tajya Batmya)

Raigad Accident News
Dhule News: गावगुंडांचा त्रास, पोलिस चौकी उभारा; शिवसेनेतर्फे आंदोलन

मुंबई– गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) महाड शहर हद्दीत बुटाला हॉलसमोर सुंदरवाडी येथे कार आणि दुचाकी यामध्ये भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. माजी सरपंच प्रमोद महामुंणकर हे आपल्या मोटरसायकल वरून घरी जात होते. या दरम्‍यान समोरून येत असलेल्‍या कारने त्‍यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.

Raigad Accident News
Nashik News: पुढाऱ्यांना गाव बंदी; शेतकऱ्यांनी लावले गावाच्‍या चारही बाजूला फलक

पोलिसांकडून पंचनामा

महाडच्या (Mahad) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. माजी सरपंच प्रमोद म्हामुणकर यांच्या अपघाती अकाली मृत्युच्या बातमीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com