Raigad : 'महाराष्ट्रात असली थेरं चालणार नाही'; अश्लील गाण्यांवरील महिलांचा नाचगाण्याचा कार्यक्रम शिवभक्तांनी उधळला

यूपी-बिहारच्या अश्लील गाण्यांवर नाचणाऱ्या बायकांचा कार्यक्रम उधळून लावल्याचा प्रकार रायगडमध्ये घडला आहे.
Raigad News
Raigad News Saam Tv

सचिन कदम

Raigad News : यूपी-बिहारच्या अश्लील गाण्यांवर नाचणाऱ्या महिलांचा कार्यक्रम उधळून लावल्याची घटना रायगडमध्ये घडली आहे. रायगडच्या पेण येथील आंबेगाव हद्दीत हा प्रकार घडला आहे. या कार्यक्रमांवर भडकलेल्या शिवभक्तांनी हा कार्यक्रम उधळून लावला आहे. कार्यक्रम उधळून लावल्यानंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. (Latest Marathi News)

Raigad News
Nashik : केंद्र सरकारचा महामार्ग भूमिपूजन कार्यक्रम फ्लॉप? नितीन गडकरींच्या सभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ

युपी-बिहारमध्ये ज्या प्रमाणे स्टेजवर महिला नाचवल्या जातात. त्या प्रमाणे रायगड जिल्ह्यात काल, शनिवारी डीजेवर अश्लील गाणी लावून महिला नाचवण्याचा क्रार्यक्रम झाला. अजय सहानी या परप्रांतीय युवकाने पेण येथील आंबेगाव हद्दीतील आपल्या घरासमोर या युपी-बिहारच्या प्रकारचा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डीजेच्या तालावर महिला (Women) अश्लील हावभाव करून नाचवल्या जात असल्याचे समजताच स्थानिक शिवभक्तांनी कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन हा नाच गाण्याचा कार्यक्रम उधळून लावला. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे आव्हान करीत यापुढे अशी थेरं येथे चालू देणार नाही, अशी तंबी स्थानिकांनी आयोजकांना दिली. पेणमधील सह्याद्रीचे दुर्गसेवक, स्वराज्य सेवक, आंबेगाव ग्रामस्थ आणि गणपतीवाडी येथील स्थानिक तरुण कार्यक्रम बंद करायला पुढे होते.

गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात झाला होता तुफान राडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील राजुरी शिवारात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमीचा डान्स सुरू असताना, शेकडो लोक स्टेजवर चढल्याने एकचं गोंधळ उडाला होता. यावेळी स्टेजवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे कार्यक्रम बंद करण्याची नामुष्की आयोजकावर ओढवली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com