रायगडात पिटोरी मातेचे घरोघरी उत्साहात पूजन...

मुलांना सुख समृद्धी, निरोगी आरोग्य लाभावे यासाठी केले जाते पूजन
रायगडात पिटोरी मातेचे घरोघरी उत्साहात पूजन...
रायगडात पिटोरी मातेचे घरोघरी उत्साहात पूजन...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - गणरायाचे आगमन होण्यास अवघे काही दिवस उरले असताना आज घरोघरी पिटोरी मातेचे आगमन उत्साहात झाले. रायगडात Raigad पिटोरी Pitori अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी झाली. कुटुंबाच्या सुख-समृद्धी, निरोगी आरोग्यासाठी पिटोरी मातेचे पूजन सवाक्षिण करीत असतात. सायंकाळच्या सुमारास वाजत गाजत पिटोरीचे आगमन झाल्यानंतर तिची यथासांग पूजन केले गेले. पिटोरी अमावस्या झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गणरायाच्या आगमनाची आतुरता भक्तांना लागली असते.

हे देखील पहा -

घाट माथ्यावर पिटोरी अमावस्या ही बैलाचे पूजन करून पोळा सण म्हणून साजरा केली जाते. रायगडात पिटोरी अमावस्या ही वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. मुलाच्या आरोग्यासाठी पिटोरी मातेचे पूजन केले जाते. विहीर किंवा नळावर ठेवलेले तेरडे हे सुपात हळदीच्या कापडात माहेरवाशीण सायंकाळी पूजा करून घरात घेऊन येते. माहेरवाशिणीची पूजा करून आणलेली सुपातील तेरड्याला जवून तिला पिटोरी देवीचे रूप दिले जाते.

रायगडात पिटोरी मातेचे घरोघरी उत्साहात पूजन...
परभणीत लसीकरणाला गती; प्रत्येक वाॅर्डात जाऊन होणार लसीकरण

साडी नेसवुन दागिने परिधान केले जाते. त्यानंतर चौरंगावर पिटोरी मातेची स्थापना केली जाते.पिटोरी मातेची स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य यथासांग पूजा करतात. त्यानंतर एकत्रित आरती केली जाते. रात्रभर पिटोरी मातेचे जागरण केले जाते आणि पहाटे तळ्यात, समुद्रात तिचे विसर्जन केले जाते.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com