रायगड पोलीस दलाला 'बेस्ट पोलीस युनिट अवार्ड' ने करणार सन्मानित

जिल्हा पोलिस दलाच्या या पुरस्कारामुळे रायगडचे नाव उंचावले आहे. तर मिळालेला हा बहुमान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच्या कामगिरीमुळे मिळाला आहे.
रायगड पोलीस दलाला 'बेस्ट पोलीस युनिट अवार्ड' ने करणार सन्मानित
रायगड पोलीस दलाला 'बेस्ट पोलीस युनिट अवार्ड' ने करणार सन्मानित राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्हा (Raigad Police) पोलिसांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवली असल्याने, गुन्हेगारी नियंत्रण, पोलिसांचे जनतेशी असलेला सुसंवाद या कारणामुळे रायगड पोलीस दल हे राज्यात अव्वल ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (Maharashtra State Police Director General) कार्यालयाकडून रायगड पोलीस दलाची 'सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कारा' साठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या या पुरस्कारामुळे रायगडचे नाव उंचावले आहे. तर मिळालेला हा बहुमान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच्या कामगिरीमुळे मिळाला आहे. त्यामुळे तेच खरे मानकरी असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी मिळालेल्या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया दिली.

रायगड पोलीस दलाला 'बेस्ट पोलीस युनिट अवार्ड' ने करणार सन्मानित
रशियाने Facebook, Twitter आणि Telegramला ठोठावला दंड; जाणून घ्या कारण

राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहीत करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी "सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार" प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस दलाची "बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड" साठी निवड करण्यात आली आहे.

रायगड पोलिसांनी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्याचा तपास त्वरित लावणे, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, पोलिसांचे कामकाज, वागणूक, नागरिकांच्या हिताचे निर्णय या बाबीचा समावेशाच मूल्यकन करण्यात आले आहे.. जिल्हा पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्हा हा अ वर्गात निवडण्यात आला असून "सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कारा" ने पोलीस दल सन्मानित होणार आहे. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेन्‍द्र सिंह यांच्या स्वाक्षरीने आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व संपूर्ण रायगड पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com