रायगडात सहा नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले...

राजकीय पक्षांची मोर्चे बांधणीला आला वेग
रायगडात सहा नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले...
रायगडात सहा नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत निवडणूक (Elections) 21 डिसेंबरला जाहीर केली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचेही निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा, पोलादपूर आणि नव्याने निर्माण झालेल्या पाली नगरपंचायतीमध्ये मतदान 21 डिसेंबरला होत आहे. तर निकाल 22 डिसेंबरला लागणार आहे. 24 नोव्हेंबर पासून या नगरपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षाची मोर्चे बांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढविणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट संकेत नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख पक्षांनी आपली ताकद या निवडणुकीत सिद्ध करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाली नगरपंचायत नव्याने निर्माण झाली असल्याने पहिलीच निवडणूक होत आहे. पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकल्याने अपक्षांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर नगरपंचायत झाल्यानंतर वर्षभर आता प्रशासक नेमण्यात आले होते. त्यामुळे पहिलीच नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षाने आता कंबर कसली आहे. खालापूर (शेकाप), तळा, पोलादपूर (शिवसेना), म्हसळा, माणगाव (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी सत्ता या नगरपंचायतीवर आहेत.

रायगडात सहा नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले...
Parambir Singh: कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीरसिंह अखेर मुंबईत परतले

नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतमध्ये सदस्य संख्या वाढली नसली तरी नवीन प्रभाग रचना पडली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता नवीन प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे दोन राष्ट्रवादीकडे दोन आणि शेकापकडे एक नगरपंचायतआहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार की वेगवेगळे हे जिल्ह्यातील नेत्याच्या संकेतावर आहे. मात्र निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे.

1 ते 7 डिसेंबर या दरम्यात नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी दाखल करायची आहेत. 8 डिसेंबर रोजी छाननी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर रिंगणात किती उमेदवार राहणार आहेत हे स्पष्ट होणार आहे. 21 डिसेंबरला सहा नगरपंचायती साठी मतदान होणार असून 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र सध्या तरी जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com