रायगड: ST चालकाला मारहाण पडली महागात; न्यायालयाने सुनावली सक्तमजुरी !

महाराष्ट्र राज्य परिवहन महमंडळाच्या चालकाला भर रस्त्यात बस अडवून मारहाण प्रकरण आरोपी संदीप माने याला चांगलेच महागात पडले असून न्यायालयाने त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
रायगड
रायगडराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड: महाराष्ट्र राज्य परिवहन महमंडळाच्या (MSRTC) चालकाला भर रस्त्यात बस अडवून मारहाण प्रकरण आरोपी संदीप माने याला चांगलेच महागात पडले असून न्यायालयाने त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दोन हजाराचा दंड ही सुनावला आहे. अलिबाग जिल्हा न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

रायगड
मलिक प्रकरणावरून राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल; “आता स्वत: दाऊदनं फोन करून…”

फिर्यादी रमेश भानुदास माकणीकर हे श्रीवर्धन एसटी बस स्थानकात चालक या पदावर कार्यरत आहेत. ता. 17 ऑगस्ट 2016 माकणीकर हे प्रवाश्यांना बसने घेऊन मुंबई सेंट्रल आगारातून श्रीवर्धनकडे निघाले होते. पेण (Pen) बाजारपेठेत सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास बस आली असता आरोपी संदीप माने हे रस्त्यात असल्याने हॉर्न वाजवला. आरोपी याला या गोष्टीचा राग आल्याने आपली स्कुटी बस समोर अडवून फिर्यादी याना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत फिर्यादी माकणीकर यांनी पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हे देखील पहा-

पेण पोलिसांनी (Pen Police) याबाबत आरोपपत्र अलिबाग (Alibaug) न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी ता. 14 मार्च रोजी पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांनी आठ साक्षीदार तपासले. सरकारी वकील यानी केलेला युक्तीवाद महत्वाचा ठरला. न्यायाधीश जयदीप माने यांनी कायद्यानुसार एक वर्ष सक्षम कारावास आणि एक हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी रमेश माकणीकर, वाहक मेटकरी, प्रवासी अर्चना म्हात्रे, डॉ मानसी कस्तुरे, श्रीवर्धन आगर व्यवस्थापक, तापसीक अंमलदार एन एन येरूणकर याची साक्ष महत्वाची ठरली. पैरवी कर्मचारी पोशी सातपुते, पीव्ही कारखिले, पोह सचिन खैरनार, पोशी सिद्धेश पाटील, प्रणिता खट्याळ याचे सहकार्य मोलाचे ठरले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com