रायगड जिल्हा परिषदेला स्वतःच्याच मालकिच्या जागेची माहिती नाही; सभेत मुद्दा गाजला

रायगड जिल्हा परिषद स्थापन होऊन 60 वर्ष झाले तरी प्रशासनाकडे स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जागांची माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेला स्वतःच्याच मालकिच्या जागेची माहिती नाही; सभेत मुद्दा गाजला
रायगड जिल्हा परिषदेला स्वतःच्याच मालकिच्या जागेची माहिती नाही; सभेत मुद्दा गाजलाराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: रायगड जिल्हा परिषद (Raigad Zilla Parishad) स्थापन होऊन 60 वर्ष झाले तरी प्रशासनाकडे स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जागांची माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. या विषयावर शिवसेना सदस्यांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले. यावेळी मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. किरण पाटील (Dr. Kiran Patil) यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागेच्या बाबत माहिती संकलन सुरू असून त्यासाठी एक सॉफ्टवेअर महिन्याभरात कार्यन्वित करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर अतिक्रमणे (encroachment) कुठे आणि किती प्रमाणात झाली असल्याचे स्पष्ट होऊ शकेल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले. सर्वसाधारण सभेत पाणी, आरोग्य आणि जागेच्या प्रश्नवर ही सभा गाजली. (Raigad Zilla Parishad does not know its own land; The issue was raised in the meeting)

हे देखील पहा -

राजिपची सर्वसधारण सभा शिवर्तीमधील कै. ना. ना. पटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजिपच्या अध्यक्ष योगीता परधी (Pogita Pardhi, Raigad) होत्या. या सभेत रायगड जिल्हा परिषदेच्या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा या सभेत चर्चेला आला. या विषयावर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले. उमटे धरणावर जल शुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या धरणातून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. जर या धरणातून शुद्द पाणीपुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी या सभेत दिला. नैसर्गिक आपत्तीसाठी आलेला निधी राजीपाच्या विविध विभांगांकडे वर्ग करून घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केली. या सभेत कंत्राटी सफाई कामगार, स्वच्छता कर्मचारी आणि वाहन चालकांच्या थकीत वेतनाचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर निधीसाठी पाठपुरावा सुरु असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले. सभांचे इतिवृत्त उशिरा मिळत असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

रायगड जिल्हा परिषदेला स्वतःच्याच मालकिच्या जागेची माहिती नाही; सभेत मुद्दा गाजला
१०० कोटी दंड ठोठावल्यानंतरही अंबरनाथ-बदलापुरात रासायनिक सांडपाणी थेट नदीत!

कर्नाळा अर्बन बँकेत ज्या ग्रामपंचातींनी खाती उघडली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, पनवेल तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीमधील नैना प्रकल्पात होत असेलेली बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेतील (राजिप) भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रमोद जाधव यांनी राजिपच्या सर्वधारण सभेत केली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com