Nashik | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या... (पहा व्हिडिओ)
Nashik | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या... (पहा व्हिडिओ)Saam Tv

Nashik | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या... (पहा व्हिडिओ)

रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली

नाशिक : रेल्वे अधिकाऱ्यांच्या Railway Officer सततच्या जाचाला कंटाळून harassment एका रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रेल्वेच्या १६ अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध येवला yevala nashik पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ-

सुसाईड नोट लिहून वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. रेल्वेचे अधिकारी Railway Officer कोणालाही जुमानत नाही. मनमानी करत आहेत, असा आरोप नेहमी करण्यात येतो. अधिकाऱ्यांच्या सततच्या मनमानीचा एक निरपराध कर्मचारी बळी ठरल्याची खळबळजनक घटना येवला तालुक्यात घडली आहे.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून भाऊसाहेब गायकवाड या कर्मचाऱ्याने रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली आहे. त्याच्याकडे आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांवर येवला तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर तारूर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत भाऊसाहेब गायकवाड खलासी म्हणून कार्यरत होते.

Nashik | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या... (पहा व्हिडिओ)
Ambernath: MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीण

5 ऑक्टोबर दिवशी त्यांनी रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली आहे. त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच ज्यांनी छळ केला त्यांची नावे या सुसाईड नोटमध्ये होती. यामुळे पोलिसांनी १६ अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे माझ्या वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी मयत भाऊसाहेब गायकवाड यांची मंगला गायकवाड मुलगी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com