रेल्वे कर्मचाऱ्याने सासुरवाडीला जाऊन शेजारच्या मुलीवर केला अत्याचार, त्यानंतर...

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Bhandara crime update
Bhandara crime updatesaam tv

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाने घराशेजारील एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl molestation) अत्याचार केल्यान खळबळ उडाली आहे. गौतम लोणारे असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात आंधळगाव पोलीस (Police) स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत (Police FIR) गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिना उलटूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपी गौतम हा रेल्वे कर्मचारी असून लोकोपायलट म्हणून काम पाहतो.

Bhandara crime update
ST चालकाने मुलीचा मृतदेह नेला थेट आगारात; आगार प्रमुखावर केले गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम लोणारे हा नागपूर जिल्ह्यातील वायगाव येथील रहिवासी आहे. तसंच मोहाडी येथील पांढराबोडी येथे गौतमची सासुरवाडी आहे. गौतमने सासऱ्याच्या घराजवळ असलेल्या एका अल्पयीन मुलीवर 21 एप्रिलला अत्याचार केला. त्यानंतर या प्रकाराबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारण्यात येईल. अशी धमकीही गौतमने पीडित मुलीला दिली.

परंतु, पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंहबीयांना सांगितला. त्यानंतर गौतम विरोधात आंधळगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गौतम फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. मात्र, महिना झाला तरीही आरोपीचा शोध लागला नाही, त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com