Railway Job Vacancy: तयारीला लागा! रेल्वेत १० वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३६२४ पदांसाठी मोठी भरती

Railway Jobs for 10th Pass: सरकारी नोकरीच्या पतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी रेल्वेने मोठी भरती काढलीये.
Railway Job Vacancy
Railway Job VacancySaam TV

Government Job: सरकारी नोकरी मिळावी असं उच्चशिक्षित व्यक्तीपासून अगदी १०वी पास व्यक्तीला देखील वाटत असतं. आता सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीच्या पतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी रेल्वेने मोठी भरती काढलीये. (Latest Marathi News)

१० वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी

रेल्वे मार्फत काढण्यात आलेली ही भरती १० वी पास असलेल्या उमेदवारांसाठी आहे. रेल्वे रिक्रूटमेट सेल वेस्टर्न रीजन (RRC WR) ने अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी भरती काढली आहे. एकून ३६२४ पदांसाठी ही मेगा भरती होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

Railway Job Vacancy
Madhya Pradesh Crime News: साडी खेचली, फोटो काढले अन् बेदम मारहाण करत ट्रेनखाली ढकलून दिलं; धक्कादायक घटनेनं ग्वाल्हेर हादरलं

फॉर्म भरण्याची तारीख?

रेल्वे रिक्रूटमेट सेल वेस्टर्न रीजनमधील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. २७ जून पासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात होईल. आवश्यक ती कागदपत्रे देत तुम्ही अप्लाय करु शकता. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ देण्यात आली आहे. https://rrc-wr.com/ या संकेतस्थळाला भेट देत तुम्ही अप्लाय करु शकता.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण.

Railway Job Vacancy
Maharashtra Talathi Bharti 2023: खुशखबर! तलाठी गट 'क' संवर्गातील पदांसाठी मोठी भरती; कधी होणार परीक्षा?

RRC WR शिकाऊ भरती २०२३ साठी निवड प्रक्रिया

निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. ज्या अर्जदारांनी मॅट्रिक [किमान 50% (एकूण) गुणांसह] आणि आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व देऊन मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन तयार केली जाईल.

अर्ज भरण्यासाठी शुल्क

अर्ज फी (नॉन-रिफंडेबल) – रु. 100/-. (SC/ST/PWD/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com