पावसाचा काेकण रेल्वेला फटका; 'या' गाड्या झाल्या रद्द
kokan railway- Saam Tv

पावसाचा काेकण रेल्वेला फटका; 'या' गाड्या झाल्या रद्द

मुंबईसह काेकण रेल्वे kokan railway मार्गावर धावणा-या गाड्यांना बसला आहे. रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे नऊ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द केली आहे. याबराेबरच मडगावहून मुंबईला येणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द केली आहे. (rain-hits-kokan-railway-schudule-madgoan-marathi-news-sml80)

दाेन दिवसांपुर्वी दक्षिण रेल्वे अंतर्गत येणा-या मार्गावरील काेसळलेल्या दरडीमुळे लाेकमान्य टिळक टर्मिनस काेचूवेली साप्ताहिक एक्सप्रेस रद्द केली आहे. याबराेबरच 20 जूलैची तिरुअनंतपूरम नेत्रावली डेली स्पेशल गाडी रद्द करण्यात आली आहे.

kokan railway
सातारा, वाई, क-हाड, फलटण शहरात ऑनलाईन नाेंदणी करणा-यांनाच लस

कोकण रेल्वेच्या ओल्ड गोवा स्टेशन जवळच्या बाेग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने अनेक गाड्या खोळंबले आहेत. यापैकी सात गाड्या वेगवेगळे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. त्यापैकी चार गाड्यांचे प्रवासी बसच्या साह्याने मडगाव स्टेशनवरती आणण्यात येत आहेत. चार गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

यापैकी केरळमधून येणाऱ्या गाड्या मडगाव लोंढा मार्गे पुण्याकडे जातील. दिल्लीहून येणाऱ्या गाड्या पनवेल मार्गे सांगली मिरज मार्गे वडगावला येतील आणि पुढे त्या केरळला जातील असे रेल्वेने कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com