काजळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला; गगनगिरी मठास वेढा

काजळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला; गगनगिरी मठास वेढा
gagangiri math

सातारा : क-हाड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर नेचल येथे गगनगिरी मठाला पूराच्या पाण्याने वेढले. काजळी नदीस पूर आल्याने नदीचे पाणी मठात घुसले. यामुळे मठ नजीकचे ग्रामस्थ भयभीत झाले. या परिसरात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळेच पूराची चाहुल लागल्याने मठ निर्मनुष्य करण्यात आला होता. (rain-update-karad-chiplun-kajli-river-flooded-sml80)

आता गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस या भागात सुरु असल्याने काजळी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचे लोंढे मठामध्ये घुसल्याने मठाला पाण्याचा वेढा पडला आहे.

गेले तीन दिवस या भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. प्रशासनाने पूराचा धाेका असल्याचे कळविल्यानंतर मठ निर्मनुष्य करण्यात आला हाेता. पूराचे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थ मठा समाेर जमले हाेते. सततच्या पडणा-या पावसामुळे मठामध्ये gagangiri math येणारे पाण्याचे लोंढे आणि काजळी नदीचे महारौद्र रूप पाहून काळजात धडकी भरत आहे.

gagangiri math
देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव

दरम्यान सातारा जिल्ह्यात बुधवार दिवसभरापासून आज (गुरुवार) सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 76.2 मिली मीटर पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 196.6 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सातारा जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये अशी सातारा- 100.6 मिली मीटर (192.6) , जावळी 140.2(295) , पाटण 132.9 (290.4) , कराड 81.4 (156.6) , कोरेगाव 50.2 (134.9) , खटाव 37.3 (83.3) , माण 8.1 (126.4) , फलटण 4.7 (70.1) , खंडाळा 23.7 (68.7), वाई 112.4 (232.8), महाबळेश्वर 198.3 (848.4).

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com