रायगडात पहाटेपासून पावसाची हजेरी; भात लावणी अंतिम टप्प्यात
Rain In Raigad

रायगडात पहाटेपासून पावसाची हजेरी; भात लावणी अंतिम टप्प्यात

- राजेश भोस्तेकर

रायगड : जिल्ह्यात गुरुवारी (ता.15) थाेडी फार उसंत घेतलेल्या पावसाने आज (शुक्रवार) पहाटेपासून पुन्हा एकदा हजेरी Rain In Raigad लावलेली आहे. येथे पावसाचा जोर नसला तरी संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे. (rain-update-raigad-farmers-started-rice-cultivation)

या भागात उत्तम पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील नद्याही तुडुंब भरून वाहत असल्या तरी धोक्याच्या पातळीच्या खाली आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसास प्रारंभ झाला हाेता. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार चार दिवस पावसाने रायगडकरांना झोडपून काढले आहे. गुरुवारी ता. 15 जुलै पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला हाेता. मात्र पावसाची संततधार सुरू हाेती.

Rain In Raigad
क-हाडात काेराेनाचा विळखा घट्ट; दिवसात नवे 247 रुग्ण,13 मृत्यू

आज (शुक्रवार) पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या पुन्हा झालेल्या आगमनाने रखडलेली भात लावणीची कामे आता पूर्ण होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी राजाही सुखावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com