रत्नागिरीत भाती शेती धाेक्यात; पुढचे 18 तास महत्वाचे

रत्नागिरीत भाती शेती धाेक्यात; पुढचे 18 तास महत्वाचे
rice crop

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून येथे पडणाऱ्या सततच्या पावसामुळे त्याचा फटका भात शेतीला बसण्याची शक्यता निर्माण झाली. नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नद्यांनी आपलं पात्र सोडलेला आहे. यामुळे नजीकच्या शेतांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. परिणामी येथील शेती ही पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. (rain-update-ratnagiri-rice-crop-farmers-worried-marathi-news)

रत्नागिरीत अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यासाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सतत पाऊस पडत राहिला तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढू हाेऊ शकते. हे पाणी असेच साचत राहिले त्याचा निचरा होणार नाही. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते याचा फटका भात शेतीला rice crop बसू शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीकरांनाे सावधान!

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पडणार्‍या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. तरीही पुढचे 18 तास हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चिंताजनक असणार आहेत. पुढच्या 18 तासांत मुसळधार अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

rice crop
काेल्हापूरात साेमवारपासून दुकाने खूली हाेणार; टाेपेंचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे. येथील नद्या अक्षरशः दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. रत्नागिरीतल्या नद्यांच रौद्र रुप या पावसामुळे पाहायला मिळते.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com