खळग्यातील दगडी धरणाचे दरवाजे 20 ऑगस्टपर्यंत राहणार खूले

खळग्यातील दगडी धरणाचे दरवाजे 20 ऑगस्टपर्यंत राहणार खूले
dodamarg

सिंधुदुर्ग (जि. सातारा) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवासंपासून पावसाने जाेर धरला हाेता. आज (शुक्रवार) येथे ढगाळ वातावरण असले तरी पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी साचलेले पाणी आेसरत आहे. दरम्यान दोडामार्ग dodamarg तिलारी खोऱ्यातील प्रकल्पाच्या आंतरराज्य धरणाचे चारही दरवाजे 20 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे उघडे ठेवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या 10 गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (rain-update-sindhudurg-dodamarg-dam-doors-to-be-open-till-20-august)

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे धरण पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. परिणामी 20 ऑगस्टपर्यंत खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात येणार आहेत.

या धरणाचे दरवाजे उघडे राहणार असल्याने धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी सांडव्यावरून उच्च कालव्याद्वारे थेट तिलारी नदीत जाणार आहे. सद्यस्थितीत हवामान विभागाने येत्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परिणामी धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढत राहिल्यास पाणी पातळी वाढेल. यामुळे तिलारी नदीवरील सर्व कालवे पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिलारी नदीची धोका पातळी 43.600 मीटर आहे. तसेच इशारा पातळी 41.600 मीटर आहे. आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता ही पातळी 40.400 मीटरपर्यंत पोहचलेली आहे. पाण्यामुळे काेणत्याही प्रकारचे नुकसान हाेऊ नये यासाठी प्रशासनाने नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे - आवाडे, मणेरी, कुडासा, साटेली - भेडशी गावातील ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सूचना प्रसिद्ध करावेत असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

dodamarg
लढवय्या जवानाचे धुमधडाक्यात स्वागत; ग्रामस्थांचा ऊर भरुन आला

प्रशासनाच्या ग्रामस्थांसह ग्रामपंचायतींना सूचना

रात्रीच्यावेळी नागरिकांनी नदीपात्रातून ये-जा करू नये.

नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यकती सतर्कता बाळगावी.

कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे - आवाडे, मणेरी, कुडासा, साटेली - भेडशी ग्रामपंचायतींनी सतर्कतेबाबत दवंडी पिटवून लोकांना दक्ष राहण्यास सांगावे.

तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे.

आपत्तीजनक स्थिती उद्भभवल्यास त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरीत द्यावी.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com