सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह काेयना पाणलाेट क्षेत्रात पावसाचा जाेर

सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह काेयना पाणलाेट क्षेत्रात पावसाचा जाेर
rain updates

गेल्या तीन चार दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे rain updates. आज (बुधवार) दाेन्ही जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरु आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या पावासमुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. परंतु काही भागात भात शेतीचे नुकसानाची भिती व्यक्त केली जात आहे. (rain-update-sindhudurg-ratnagiri-satara-marathi-news)

सातारा जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात अधून मधून रिमझिम पाऊस सुरु असताे. काेयना, महाबळेश्वर, नवजा येथे मात्र पावसाचा जाेर आहे.

तळकोकणात चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम

तळकोकणात चौथ्या दिवशीही (बुधवार, ता. 14) पावसाचा जोर अधून-मधून कायम आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. दूसरीकडे मात्र हा पाऊस सह्याद्री पट्ट्यात सर्वाधिक पडत असल्यामुळे नदी नाल्यांची पाणी पातळीत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी इशारा पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नदीकाठच्या राहणाऱ्या गावांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.दर

rain updates
खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

रत्नागिरीत पावसाचे धुमशान

रत्नागिरीत सध्या पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे इथल्या नद्या अक्षरश: दुथडी भरुन वाहताहेत. हवामान खात्याने 16 जुलैपर्यंत रत्नागिरीत रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस रत्नागिरीत कोसळू शकतो. त्यामुळे नदी काठच्या गावांत पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्क रहा अशी सूचना केली आहे.

काेयना पाणलाेट क्षेत्रात जाेर

दरम्यान सातारा जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात अधून मधून रिमझिम पाऊस सुरु असताे. काेयना पाणलाेट क्षेत्रात पावसाचा जाेर आहे. काेयना धरणात 44.43 पाणी साठा झाला आहे. धरणात 16 हजार 065 पाण्याची आवक सुरु असल्याची माहिती काेयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com