NDRF चे दाेन पथक कोल्हापूरात; एक शिराेळला हाेणार रवाना

ndrf team
ndrf team

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर मांडुकलीजवळ पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान काेल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीमूळे एन.डी.आर.एफला बाेलाविण्यात आले आहे. दाेन पथक पुण्याहून काेल्हापूरला दाखल झाली आहेत. एक पथक शिराेळला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (rain-updates-kolhapur-panchganga-fonda-ghat-sml80)

हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात दाेन दिवस अतिवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला हाेता. बुधवारी रात्री पावसाचा जाेर वाढला rain update kolhapur. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापुर्वीच दिला आहे.

सततच्या पडणा-या पावसामुळे झाडे उन्मळून पडू लागली आहेत. फोंडा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीचे पाणी पुलावर आल्याने बर्की गावाचा संपर्क तुटला. अनेक जिल्हा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. गगनबावडा मार्गावर चार ठिकाणी पाणी आले आहे. तसेच ऐतवडे- निलेवाडी पुलावर पाणी आले आहे.

ndrf team
Live : चिपळुणात बचाव कार्यास प्रारंभ : विजय वडेवट्टीवार

काेल्हापूर शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुट 50 इंचवर आली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. त्यामुळे पाऊस सतत सुरु राहिल्यास काही तासात पाणी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. याबराेबरच जिल्ह्यातील 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संभाव्य पूर स्थिती लक्षात घेता एन.डी.आर.एफ चे दाेन पथक काेल्हापूरात दाखल झाले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे पथक आले आहे. या ठिकाणहून एक पथक शिराेळला रवाना हाेणार आहे. एक पथक काेल्हापूरात थांबेल अशी माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com