वारणा, कृष्णा नदीचे पाणी शेतात घुसले; चांदोलीत अतिवृष्टी

वारणा, कृष्णा नदीचे पाणी शेतात घुसले; चांदोलीत अतिवृष्टी
rain update

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. बुधवारपासून वारणा पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली असल्याने वारणेच पात्र बाहेर पडले आहे. पावसाने अशीच हजेरी लावली तर आणखी पाणी वाढणार आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (rain-updates-sangli-kolhapur-marathi-news-sml80)

दरम्यान कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या २४ तासात टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 180 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णेच्या पाणी पातळी साडे सतरा फूटांवर गेली आहे. वारणेच्या नदी पात्र बाहेर पडले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी शिरले आहे. आज (गुरुवार) धरणातून पाणी सोडणार असल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

rain update
ब्रेकिंग : NDRF चे दाेन पथक पुण्याहून कोल्हापूरला रवाना

सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. बुधवारपासून सलग पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात कृष्णा नदी दुस-यांदा पात्रा बाहेर पडून वाहत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील नागरिकांत चिंता वाढली आहे.

दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत rain update असल्याने आज (गुरुवार) कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या २४ तासात हा विसर्ग टप्प्या टप्प्याने वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com