राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा

महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि कर्नाटक किनारपट्टी दरम्यान, कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा Saam Tv

पुणे : महाराष्ट्र Maharashtra कोकण Konkan किनारपट्टी आणि कर्नाटक Karnataka किनारपट्टी दरम्यान, कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे मागील आठवड्याभरात मुंबईसह Mumbai, कोकणामधील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात रविवारपर्यंत कोकण, पुणे Pune, सातारा Satara आणि कोल्हापूर या जिल्ह्याला ४ ते ५ दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनकडून यावेळी वर्तविण्यात आला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचे पश्‍चिमेकडील काही भाग त्याच्या नेहमीच्या स्थितीवर असणार आहे. तो उत्तरेकडील भागात सरकणार आहे, तर पूर्वभाग काहीसा उत्तरेकडे राहणार आहे. तो दक्षिणेकडे येणार आहे. यातच बंगालच्या उपसागरामध्ये शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दिले आहेत.

हे देखील पहा-

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला लगत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. तो पुढील ३ ते ४ दिवस तसेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात विजांसह जोराचा पाऊस पडण्यात अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तविला आहे.

राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा
Maharashtra Heavy Rain: मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळित

या ठिकाणी होणार जोरदार पाऊस

बुधवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली आणि गोंदिया.

गुरुवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

शुक्रवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ.

शनिवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com