हादगावात आभाळ फाटलं, झोपेतच पाण्याने गाठलं!

हादगावात आभाळ फाटलं, झोपेतच पाण्याने गाठलं!
हादगावला पुराने घेरले.

परभणी ः अनेक दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा प्रकटला. परंतु त्याच्या धो-धो बरसण्याने अनेकांच्या संसारात माती कालवली. शेकडो लोकांचे त्याने घर हिरावून घेतले. घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जीव वाचवण्यासाठी महिलांनी लहान मुलांना घेऊन सुरक्षित स्थान गाठले. हे विदारक चित्र आहे परभणी पासून 70 किलोमीटरवर असलेल्या नखाते हादगावाचे.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पहाटे जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. पाथरीच्या नखाते हादगाव मंडळात मात्र ढगफुटी झाली. परिरातून वाहणाऱ्या नदीची खोलीकरण न झाल्याने तिने मर्यादा ओलांडली. या नदीचे पाणी गावातील इंदिरानगर भागातील शेकडो घरात शिरले. महिलांनी आपल्या लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढत कसाबसा सुरक्षित मार्ग शोधला. अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्यात अनेक गावकऱ्यांचे संसार वाहून गेले.Rain water infiltrated in Hadgaon

हादगावला पुराने घेरले.
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

रात्रीतून आभाळ फाटल्याने तेथील लोकांची जीवनमरणाची लढाई सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडे कोण्या पुढाऱ्याने डुंकूनही न पाहिल्याने त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळल्यासारखे झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने गावातील शेकडो घरातील संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाल्याने पहिल्या दिवशी गावातील ग्रामपंचायत सदस्याने खिचडी वाटप केली. तो तेवढाच त्यांच्यासाठी आधार ठरला.Rain water infiltrated in Hadgaon

मागील अनेक दशकांपासून नखाते हदगाव ग्रामपंचायत माजी मंत्री सखाराम नखाते यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. असे असतानाही गावाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे गाव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आता पुराच्या पाण्यामुळे तर वाताहत झाली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com