राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान

जिल्ह्यामध्ये यावेळी झालेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला होता.
राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान
राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमानओंकार कदम

सातारा : जिल्ह्यामध्ये district यावेळी झालेल्या पावसाने Rain अक्षरशः हाहाकार उडवला होता. पाटण, कोयना, महाबळेश्वर Mahabaleshwar या तालुक्यांना तर सर्वात जास्त मोठा फटका या पावसाचा बसला आहे. महाबळेश्वर तालुक्यामधील डोंगर भागात असणाऱ्या झांजवड Jhanjwad गावात 22 जुलै दरम्यान झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

अजूनही झांजवडसह, चतुरबेट, दुधगाव, गोरोशी Goroshi या दुर्गम भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असून, शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. अतिवृष्टीमुळे heavy rains याठिकाणच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पूल देखील वाहून गेले आहेत. डोंगरातून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान
कोकणात पावसाचं थैमान, पाहा नदीचं हे रौद्ररुप

डोंगराळ भागात असणारी अनेक घरे खचल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे राहणे मुश्किल झाले आहे. सध्या या भागामधील नागरिक शासनाला पुनर्वसनाची आणि झालेल्या नुकसानीबाबत शासनाने मदत करावी अशी मागणी नागरिक करत आहे. झांजवड परिसरातील डोंगर खचल्यामुळे झालेले विदारक चित्र ड्रोन कॅमेरा तून टिपले आहे. यामध्ये वाहून गेलेली शेती रस्ते तसेच पूल दिसत आहे. त्याचप्रमाणे दरडी कोसळल्याने डोंगर खचून खाली आलेला असल्याचे चित्र सुद्धा या मध्ये स्पष्ट दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.