वर्ध्यात पावसाचा जोर वाढला; २० कुटुंबांच स्थलांतर, पुराच्या पाण्यात ७ जण अडकले

आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी ठप्प, पुलावर पोलिसांचा बंदोबस्त
Rains increased in Vardha
Rains increased in Vardhaअमर घटारे

अमर घटारे -

वर्धा : वर्ध्यात (Wardha) ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक नदी नाल्यानं पूर आला आहे. यामध्ये आष्टी शहरातील हुतात्मा स्मारक समिती परिसरात नदीचे पाणी शिरल्याने 20 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंं आहे तर समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्यभागात 7 नागरिक अडकले होते.

स्थानिक प्रशासनाच्या पथकाने अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. आष्टी तालुक्यातील साहूर, धाडी, लहान आर्वी, नवीन आष्टी, पेठ अहमदापुर येथे गावात पुराचे पाणी शिरले असून घरातील साहित्य भिजल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Rains increased in Vardha
शिवसेना कुणाची? EC च्या नोटिशीवर राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी...

दरम्यान, पाऊस (Rain) सतत सुरू असल्याने नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे सर्वच भागातील रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. आर्वी-तळेगांव वर्धमनेरी जवळील पुलावरून पाणी वाहत आहे. यासह अनेक रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 6 तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. अजूनही पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे रात्रीचे मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्याचे पूर शेतात शिरल्याने शेतपिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, पाणी शेतात शिरल्यामुळे पिके पाण्याखाली आल्याने पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली होती. तसंच आज झालेल्या पावसाचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यात 70 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडीओ -

कारंजा आष्टी आर्वी तालुक्यातील मुख्य रस्त्यासह ग्रामीण रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सर्वच रस्ते बंद आहे. कारंजा-माणिकवाडा रस्त्यावरील खडक नदीला पूर आल्याने सावरडोह, खापरी, बेलगाव, सुसुंद्रा, माणिकवाडा, तारासावंगा या गावाचा संपर्क तुटला तर आर्वी तळेगांव यासह इतर गावाचा संपर्क तुटला आहे.

खडक नदीवरील पुलावरचे पाणी रात्रभर ओसारणार नसल्यान हा मार्ग जवळपास 24 तास बंद राहणार आहे. समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाल्याला पूर आल्याने येथील रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आष्टी शहरासह 10 गावाचा विद्युतपुरवठा बंद -

आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पूर आला आयात अनेक गावांत पाणी शिरले यामुळे आष्टी शहरासह 10 गावांचा विद्युतपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी विद्युतपुरवठा बंद केल्याचे महावितरण (MSEDCL) विभागाकडून सांगण्यात आले. पूरपरिस्थिती सुरळीत झाल्यास तात्काळ विद्युतपुरवठा सुरळीत करून चालू करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com